मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात ११७ पैकी ३४ गावात येणार महिलाराज

On: January 28, 2021 12:24 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : निवडणुकीची रणधुमाळी संपताच अक्कलकोट तालुक्यात  बुधवारी ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीत ३४ ग्रामपंचायतीवर  महिलाराज आले आहे. तर ३३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या टप्प्यात एकूण ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.यात एका हंजगी गावची  निवडणूक  पुन्हा होणार आहे. तर उर्वरित ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या आरक्षण सोडतीत मात्र आगामी टप्प्यात निवडणूक होणाऱ्या गावच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. २०२०-२०२५ कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले असून सकाळी ११ वाजता परिविक्षाधिन जिल्हाधिकारी तथा तहसिलदार श्री.अंकित यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती अक्कलकोट येथे ही सभा पार पडली.

११७ गावांची नावे, आरक्षण खालील प्रमाणे – 

अनुसूचित जमाती स्त्री राखीव – अंकलगे , सांगवी खु./ममदाबाद/कोळीबेट,अनुसूचित जमाती – कलहिप्परगे अनुसूचित जाती स्त्री राखीव – गौडगाव बु., जेऊर , बबलाद/परमानंदनगर , आंदेवाडी ज.,कंठेहळ्ळी बोरगांव दे. , बोरोटी खु. , समर्थनगर अनुसूचित जाती – साफळे , कल्लप्पावाडी , चिंचोळी नं., कुमठे , संगोगी अ, सिन्नूर ,अरळी नामाप्र महिला राखीव – संगोगी ब , उमरगे , कर्जाळ, बागेहळळी , मुंढेवाडी, जेऊरवाडी , शिरवळ, बोरेगांव ,धारसंग , हंद्राळ/जैनापूर, नागणसूर , हैद्रा इब्राहिमपूर , मराठवाडी , मिरजगी , उडगी  नामाप्र – जकापूर,  हत्तीकणबस , कोन्हाळी , गुड्डेवाडी , आळगे, म्हैसलगे , तडवळ , हन्नूर, मोटयाळ/बसवगीर,सुलेरजवळगे ,करजगी ,बादोले खु. , मातनहळळी, पितापूर , किणीवाडी , आंदेवाडी खुर्दसर्वसाधारण स्त्री प्रवर्ग राखीव – बादोले,  बु.,घुंगरेगांव , सलगर , चिक्केहळळी , सांगवी बु/हिंगणी/कोळेकरवाडी , तळेवाड, दोडयाळ , सुलतानपुर , शेगांव , दहिटणेवाडी , किरनळळी चिंचोळी मै. , तोळणूर , खैराट , किणी, गुरववाडी,कडबगांव/सेवालालनगर, गौडगांव खु., कोर्सेगांव, नागोरे, नन्हेगांव , गोगांव, वसंतराव नाईक नगर, केगांव खु., भुरीकवठे, मंगरुळ , हंजगी, कल्लकर्जाळ , कुडल ,चपळगांववाडी, सदलापूर, हसापूर ,ब-हाणपूर , तोरणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव – सातनदुधनी,मुगळी ,भोसगे ,बासलेगांव ,रुद्देवाडी,डोंबरजवळगे , देविकवठे , काझीकणबस, चपळगांव , दर्शनाळ , खानापूर , दहिटणे हालहळळी अ. , केगांव  बु., वागदरी , घोळसगांव, चुंगी , हालचिंचोळी , बिंजगेर, शावळ , नाविंदगी,गळोरगी ,आंदेवाडी बु.,कुरनूर ,हिळळी,सिंदखेड,शिरवळवाडी , निमगांव ,नागनहळळी , रामपूर / इटगे, बोरोटी बु. , पालापुर,बणजगोळ अशा ११७ गावांचे आरक्षण जाहिर झाल्याची माहिती श्री.अंकित यांनी दिली.

संभाव्य सरपंचपदाच्या नावाची चर्चा

तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या.याठिकाणी  लवकरच सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे अद्याप प्रशासनाने तारखा निश्चित केलेल्या नाहीत मात्र त्या लवकरच निश्चित केल्या जातील,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.सध्या मात्र गावोगावी आरक्षणानुसार संभाव्य सरपंचपदाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment