ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरक्षणाच्या मागणीसाठी अक्कलकोटमध्ये मराठा समाज रस्त्यावर

अक्कलकोट,दि.२१ : मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या पाठिंब्यामुळे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

 

सोमवार बाजारचा दिवस असतानादेखील कडकडीत बंद पाळून सर्व समाज घटकांनी मराठा आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला.सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहराच्या प्रमुख मार्गावरून सोशल डिस्टिक्शनचे पालन करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.सोमवार बाजार दिवस असून देखील सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी ,फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, माजी नगराध्यक्ष महेश इंगळे ,मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ अध्यक्ष अमोल राजे भोसले ,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप सिध्दे, रासप जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडी खांबे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अमर शिरसाट, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण घाटगे, शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार ,अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे,वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, वडार समाजाचे अध्यक्ष अंकुश चौगुले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज निकम ,मराठा सेवा संघ शहराध्यक्ष योगेश पवार ,संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सुरेश कदम, नाभिक संघटनेचे अध्यक्ष अरुण विभुते, नगरसेवक सद्दाम शेरिकर ,लहुजी शक्ती सेनेचे वसंत देडे, बाळासाहेब शिंदे, सुभाष पुजारी, नितीन शिंदे, राहुल रुही, प्रकाश सुरवसे,ऋषी लोणारी, आप्पासाहेब पराणे,किशोर सिद्धे, सुभाष गडसिंग, मोहन चव्हाण, राहूल निंबाळकर, अरुण जाधव, शितल फुटाणे, रोहित निंबाळकर, तम्मा शेळके, आतिश पवार, राजेश निंबाळकर, मनोज गंगणे, प्रशांत शिंदे ,नरसिंह शिरसागर, अरुण महेश फुटाणे,अजय फडतरे, राजू शिंदे,संजय बडवे यांच्यासह सुमारे एक हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते
नायब तहसीलदार बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलन दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.अक्कलकोट शहर आणि तालुक्यात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

बससेवा
दिवसभर बंद

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील बससेवा पूर्णपणे बंद
करण्यात आली होती.याला नागरिकांनीदेखील सहकार्य
करत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!