ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आवश्यक कामे करून घ्या : डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या !

मुंबई:  बँकांमधील जर काही महत्त्वाची कामे असतील तर ती आधीच पूर्ण करून घ्या. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरला एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.  बँक कर्मचाऱ्यांना जरी आराम मिळणार असला तरी सामान्य माणसांच्या कामाचा यामुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टी तर नाही ना याची एकदा खात्री करुन मगच जा !

3 डिसेंबरपासून सुट्ट्या सुरू होणार

बँकांच्या सुट्ट्या 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यात कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरची सुट्टी असेल. 3 डिसेंबरनंतर 6 तारखेला रविवारी असल्याने देशभरात बँकेची साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 डिसेंबर हा डिसेंबरचा दुसरा शनिवार असल्याने बँकेत साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच रविवारी 13 रोजी साप्ताहिक सुट्टी असेल.

17, 18 19 रोजी गोवा राज्यात सुट्टी

गोव्यामध्ये 17 डिसेंबर रोजी लॉसोंग पर्व, 18 डिसेंबर रोजी पुण्यतिथी यू सो सो थम आणि 19 रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त सुट्टी असेल. यानंतर 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असेल.

ख्रिसमसची सुट्टी दोन दिवस असेल

ख्रिसमसदेखील डिसेंबर महिन्यात दोन दिवस सुट्टी असेल. 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबर रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने आठवड्याला सुट्टी असेल. दुसरीकडे 30 डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला थर्टी फर्स्टची काही राज्यात सुट्टी असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!