दक्षिण सोलापूर,दि.३ : इन्फोसिस फाउंडेशन आणि आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सिना- भीमा नदीकाठच्या गावातील तब्बल दोन हजारांहून अधिक गरीब पूरग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सिंदखेड सीना येथे ही या उपक्रमाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले मदतीच्या किटमध्ये कपडे,बकेट,मग, चटईसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. याप्रसंगी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील वडकबाळकर तसेच गावचे सरपंच शकील मकानदार, सोसायटी चेअरमन बसवराज गवसने, आप्पासाहेब मळेवाडी, मल्लेशी करके, रवी इंगळे, मडिवळाय्या स्वामी, अमोगसिध्द बिराजदार, आप्पासाहेब होळकर, अप्पाराव पाटील आदी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.