ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज 11 ते 15 जानेवारीपर्यंत बंद

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान  15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. त्यामुळे दि. 11 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची दिली.

नवीन नोंदणी वगळून बाकीचे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की, अनुज्ञप्ती चाचणी, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, नोंदणी नूतनीकरण तसेच शिबीर कार्यालयातील कामकाज बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!