ध्यास विश्वसार्ह बातमीचा

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत भाजपला धक्का ; राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी!

औरंगाबाद | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate Constituency Election result) पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा गमावली आहे. शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा त्यांनी हा विजय मिळवला आहे.

सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली असुन त्यांचा पराभव झाला आहे.

सतीश चव्हाण यांनी या निवडणुकीमध्ये ५७ हजार ७९५ मतांची आघाडी घेतली आणि सलग ३ वेळा जिंकण्याची बाजी मारली आहे. या निवडणूकीत २ लाख ४१ हजार ९०८ जणांनी मतदान केले होते. सतीश चव्हाण यांना २ टर्मची पोचपावती मिळाली आहे. दरम्यान, औरंगाबाद मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करण्यात गुंतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!