---Advertisement---

शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत पाटील

On: December 4, 2020 1:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | या राज्यातील शेतकरी… कष्टकरी… कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

दरम्यान हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जयंत पाटील यांनी समर्पित केला आहे.महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हेही या निकालाने दाखवून दिले आहे असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!