अक्कलकोट, दि.१२ : ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दररोज गावात गोळा झालेला कचरा गावाबाहेर नेण्यासाठी वागदरी ग्रामपंचायतीने एका मिनी ट्रॅक्टर खरेदी केली आहे.आता
त्या माध्यमातून कचरा गावाबाहेर टाकला जाणार आहे.
ग्रामसेविका रेखा बिराजदार यांनी ट्रॅक्टरची चावी सरपंच ललिता ढोपरे यांना सुपूर्द केली. सरपंच ललिता ढोपरे यांनी ट्रॅक्टर्सची पूजा करून हा ट्रॅक्टर स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केला. आपले गाव नेहमी स्वच्छ व सुंदर असावे, गावात गोळा झालेला कचरा गावाबाहेर फेकण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता होती ते आम्ही पूर्ण केले आहे. यापुढे गावाबाहेर असलेल्या ग्रामपंचायत जागेमध्ये कचरा टाकण्यात येईल,असे ढोपरे यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते श्रीशैल ठोंबरे यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी सुनील सावंत यांनी दिलेले गणवेश ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते गुंडप्पा पोमाजी, ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण मंगाणे, लक्ष्मीबाई पोमाजी जगदेवी मुरळी, जयश्री कोल्हे, महादेव मंगाणे, संतोष पोमाजी, प्रकाश पोमाजी , एकनाथ इंगळे, शिवानंद गोगाव, महादेव सोनकवडे यांच्यासह ग्रामस्थ,कर्मचारी उपस्थित होते.