ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान मोदींनीच महत्वाची भूमिका निभावली ; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच महत्त्वाची भूमिका निभावली, असा धक्कादायक खुलासा भाजपच्या एका बड्या नेत्यानं केलाय.

 

इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना भाजपाचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी हा गौप्यस्फोट केला. विजयवर्गीय म्हणाले,”जोपर्यंत कमलनाथ यांचं सरकार होतं, तोपर्यंत सुखानं झोपू दिलं नाही. भाजपाचा कुठला कार्यकर्ता असेल, जो कमलनाथ यांना स्वप्नातही दिसत असेल तर ते नरोत्तम मिश्रा होते. टाळ्या वाजवून मिश्रा यांचं स्वागत करायला हवं.

 


मी इथे पडद्यामागील गोष्ट सांगत आहे, याची वाच्यता कुठे करू नका. मी सुद्धा आजपर्यंत कुणालाही सांगितलेली नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगतोय. कमलनाथ यांचं सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वाची भूमिका होती, तर ती नरेंद्र मोदी यांची होती. धर्मेंद्र प्रधान यांची नव्हती. पण, कुणाला ही गोष्ट सांगू नका. मी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही,” असे म्हणत विजयवर्गीय यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

 

दरम्यान, कैलास विजयवर्गीय यांच्या दाव्याने मध्य प्रदेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याविषयी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले,”भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात काँग्रेसनं केलेल्या सर्व आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. जनादेश मिळालेलं कमलनाथ यांचं सरकार नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून पाडण्यात आलं होतं.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!