ध्यास विश्वसार्ह बातमीचा

करजगी येथे आढळला नऊ फुटाचा दुर्मिळ अजगर !

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता नऊ फुटाचा अजगर साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

यानंतर नेचर कॉन्झर्वेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली आणि ग्रामस्थांचे प्रबोधन करत घाबरून न जाण्याचे आवाहन केले. याबाबत बोलताना नेचर कॉन्झर्वेशनचे भारत छेडा म्हणाले की, हा अजगर नऊ फुटाचा आहे आणि साधारण तेरा ते चौदा किलो वजनाचा आहे आणि गेले दहा ते पंधरा वर्ष त्याचे वास्तव्य आहे,असा आमचा अंदाज आहे.

हा साप इथेच राहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.याबाबत वन विभाग प्रयत्नशील आहे.वास्तविक पाहता हा अजगर खूप दुर्मिळ आहे.१९८० नंतर पहिल्यांदा दिसला आहे.म्हणून लोकांना प्रबोधन करणार आहे. परिसर जर बदलला तर तो जगणार नाही.त्याला ज्यावेळी पकडण्यात आले त्यावेळी आजू बाजूला शंभर उंदरे होती,असे शेतकऱ्यांनी सांगितले.इरणा खजुरगी, अमर हजारे व अन्य कार्यकर्त्यांनी त्याला जिवंत पकडले आहे.करजगी येथील सखाराम शिंदे यांच्या शेतातील ऊस सध्या कारखान्याला जात आहे तिथे ऊस तोडणी सुरू आहे.त्यावेळी तो दुपारी आढळला आहे.अक्कलकोट तालुक्यात यापूर्वी असे अनेक दुर्मिळ प्रसंग आलेले आहेत.१९३४ मध्ये संस्थान काळामध्ये मागे एकदा भारतीय सिंह देखील आढळला होता.आता याविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाईल आणि त्याला पुन्हा मुक्त केले जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.दरम्यान दुपारी हा अजगर आढळल्याने पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!