मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. भिंतीवर थुंकू नका लिहूनही लोक थुंकतात. तसेच काहीसे ठाकरे सरकारचे झाल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
काही भिंतींवर “थूकना मना है” लिहिलेले असते..
तिथेच लोक जास्त थुंकतात..
ठाकरे सरकारच तेच झालं आहे!!#MetroCarShed #aarey— nitesh rane (@NiteshNRane) December 16, 2020
कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. काही भिंतींवर थुंकना मना है, असं लिहिलेलं असतं. तिथेच लोक जास्त थुंकतात. ठाकरे सरकारचंही तेच झालं आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.