अक्कलकोट, दि.४ : कारखानादारीच्या क्षेत्रात आतापर्यंत जयहिंदचा कारभार पारदर्शी राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे,असे आवाहन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.
आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे जयहिंद शुगर्सच्या सहाव्या गळीत हंगाम शुभारंभावेळी ते बोलत होते.
जयहिंदच्या आर्थिक शिस्तीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल निर्माण झाला आहे, असेही खासदार डाॅ.जयसिद्वेश्वर महास्वामीजी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे,काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलींद काळे,बोधले महाराज,चेअरमन गणेश माने देशमुख, मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख,कार्यकारी संचालक मोहन पिसे, शेत अधिकारी राजेंद्र जेऊरे,प्रा.माऊली जाधव,विजय पाटील उपस्थित होते.
प्रारंभी संतोष पाटील व शैलजा पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी माऊली जाधव,मिलींद काळे,शैलेश कोतमिरे आदींनी मनोगत व्यक्त केले.शेतकऱ्यांनी आमच्या परिवारावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे त्याला पात्र राहून आम्ही काम करू. जयहिंदकडे ऊसाची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.तसेच ऊसाचे वाढलेले क्षेत्र लक्षात घेऊन हार्वेस्टर मशिन खरेदी केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सहकार्य करावे,बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.उपस्थितांचे स्वागत चेअरमन गणेश माने देशमुख यांनी केले.यावेळी अभिनंदन गांधी,लाला राठोड,व्यंकट मोरे,अरविंद शिंदे,दयानंद पवार,विशालराज नन्ना,धनेश जाधव यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा चव्हाण यांनी केले तर आभार मोहन पिसे
यांनी मानले.