ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे : साठे,अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र

 

अक्कलकोट, दि.४ : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून २०२४ चा अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा होण्यासाठी जोरात काम करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे यांनी केले.बुधवारी अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशचंद्र सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, बाबासाहेब निंबाळकर सलीम वळसंगी, महिला अध्यक्ष माया जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना साठे म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून मी पाहतो आहे आत्तापर्यंत म्हणावे तसे पक्षवाढीसाठी प्रयत्न झालेले नाहीत म्हणून आपण मागे पडलो आता सरकार आपले आहे.त्यामुळे कामे होतील.आता नवीन पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि राष्ट्रवादीची ताकद वाढविली जाईल. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचून पक्ष वाढवून देण्यासाठी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत,अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, सरकार आपले आहे त्यामुळे मागे राहू नका, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे म्हणाले, पक्षाच्या आदेशानुसार ही मागच्यावेळी पराभव दिसत असताना केवळ नेतृत्व आदेशामुळे विधानसभा निवडणूक लढवली. यापुढच्या काळातही पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. गावागावात व घराघरात राष्ट्रवादीचे विचार पेरू,
असे त्यांनी अभिवचन दिले.अक्कलकोट
शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू,असे शहराध्यक्ष मनोज निकम यांनी सांगितले.
यावेळी सुरेशचंद्र सूर्यवंशी, दिलीप सिद्धे, बाबासाहेब निंबाळकर, मनोज निकम, शंकर व्हनमाने,अर्जुन बनसोडे, इस्माईल फुलारी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱयांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे,धनाजी मोरे
व बादोले येथील धायगोडे व सलगरे या सैन्यात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला.महादेव वाले,संजय घोडके, अर्जुन बनसोडे,विक्रांत पिसे,तालुका उपाध्यक्ष रतन बंगरगी, मैंदर्गी शहराध्यक्ष राहुल किरनळ्ळी,माणिक बिराजदार,महादेव वाले, राजरतन बाणेगाव, संजय घोडके, शीतल फुटाणे, प्रथमेश पवार, सनी सोनटक्के, प्रवीण देशमुख, आकाश शिंदे, रमेश म्हमाणे,स्वामीनाथ पोतदार, श्रीनिवास सिंदगीकर, अविराज सिद्धे, बाळासाहेब वाघमोडे, श्रीशैल चितली, नवनीत राठोड उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!