ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट;अक्कलकोटमध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन

 

अक्कलकोट,दि.२५ : कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट उगवणार आहे.
जे काही चालले आहे ते केवळ विरोधाला विरोध म्हणून सुरू
आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी`वाटप सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण दाखवण्यात आले.तत्पूर्वी झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.अक्कलकोट येथील लोकापूरे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.प्रारंभी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी,आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन,प्रभाकर मजगे,गुंडप्पा पोमाजी, अंकुश चौगुले यांच्यासह नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार कल्याणशेट्टी पुढे म्हणाले की,
कृषी कायद्याबद्दल विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत.लोकांना भडकवले जात आहे वास्तव खूप वेगळे आहे.या नव्या कायद्यामुळे बाजार समित्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.उलट याने ते चांगले नफ्यात येतील,असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना या कायद्याची नीट माहिती समजून सांगणे गरजेचे आहे याचे फायदे लोकांना सांगणे आवश्यक आहे.यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेतकरी बांधवात जाणे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे.विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे हित न पाहता निव्वळ राजकारण करीत आहे. त्यांच्यात देखील जनजागृती करणे आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, आणप्पा बाराचारे, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, महेश पाटील, गुंडप्पा पोमाजी, राजेंद्र बंदिछोडे, यशवंत धोंगडे, दयानंद बिडवे, सुनिल गंवडी, दिपक जरीपटके, प्रदिप पाटील, नागराज कुंभार, कांतु धनशेट्टी, विक्रम शिंदे, आलम कोरबू, अंबण्णा चौगुले, अंबादास कामनुरकर, रमेश कापसे, बंटी राठोड, छोटू पवार, वैभव हलसगी, ओंकार बिराजदार, वाहिदपाशा शेख आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी कायद्याची
सविस्तर माहिती

लाईव्ह कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी सन्मान रक्कम खात्यावर जमा करून या कायद्याचे महत्व पटवून दिले.या अनोख्या थेट लाईव्ह कार्यक्रमाने पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नवे कृषी कायदे व त्याचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत झाली,असे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!