अक्कलकोट, दि.६ : केंद्रातील मोदी सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी नाही तर शेतक-यांच्या भल्यासाठी आहे. काही राजकिय पक्ष शेतक-यांची दिशाभुल करीत आहे,असे स्पष्ट मत खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे जि.प सोलापूर, नागरी सुविधा योजनेअंतर्गत वागदरी जि.प सदस्य आनंद तानवडे यांच्या प्रयत्नाने भव्य अभ्यासिका सदनाच्या बांधकासाठी ५० लाख रूपये मंजुर झाले आहेत.
या बांधकामाचे भूमिपुजन डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाला.त्यावेळी
ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद तानवडे
हे होते.पुढे बोलताना डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की, देशाच्या लोकसभेतील खासदारांना वर्षाला ५ कोटीचा निधी आहे. परंतु जि.प सदस्य एका गावाला विकासासाठी ८ कोटी रूपये मंजुर करून देत असतील तर अभिमानाचा विषय आहे.या भागात तानवडे यांचे कार्य चांगले आहे.वागदरी गावाच्या विकासासाठी आपणही पाच वर्षात निधी देण्याचा प्रयत्न करू,असे सांगितले.यावेळी बोलताना आनंद तानवडे म्हणाले की, वागदरी गावाच्या विकासासाठी ८ कोटी रूपये मंजुर केले आहेत. सर्व कामे प्रगतीवर आहेत. शिवलिंगेश्वर विरक्त मठात अभ्यासिका केंद्र बांधकाम २५ लाख रू, परमेश्वर मंदिरात अभ्यासिका केंद्र ५० लाख रू, पशु वैद्यकिय केंद्र बांधकाम २५, लाख रू, प्रा आरोग्य केंद्र बांधकाम २ कोटी रू, कर्मचारी निवास व संरक्षण भिंत ३ कोटी, शाहीद जवान प्रभाकर बयाजी पात्रे यांचे स्मारक साठी ३ लाख रू असे महत्वपूर्ण काम पूर्ण झाले आहे. पुढील काळात अजुन निधी मिळवुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मल्लिनाथ स्वामी, माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे यांची भाषणे झाली. यावेळी पंचायत समिती विरोधी पक्ष नेते गुंडप्पा पोमाजी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, मल्लिनाथ शेळके, उप अभियंता पी.
जी पाटील, ग्रामसेविका रेखा बिराजदार, सरपंच ललिताबाई ढोपरे, विजयकुमार ढोपरे, लक्ष्मीबाई पोमाजी, मलप्पा निरोळी, परमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सिध्दाराम बटगेरी, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव,सुनिल सावंत, संतोष पोमाजी, नागप्पा घोळसगांव, बसवराज धड्डे, दत्तात्रय कुंभार, अमित कोथिंबीरे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मलप्पा निरोळी यांनी केले तर नागप्पा आष्टगी यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले.