ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘कोण संजय राऊत ?’….म्हणत चंद्रकांत पाटलांनी उडविली राऊतांची ‘खिल्ली’

अहमदनगरः मेट्रो कारशेड प्रकरणावरुन पु्न्हा एकदा भाजप – शिवसेना सामना रंगला आहे. मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे, असं म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

”न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का?, कोण संजय राऊत”, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी साई दरबारी जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

 

घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जा‌यचे नाही का?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. यांना निवडणूक आयोग आणि कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का?, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे, असं संजय राऊत म्हणाले होते, त्यालाच चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

 

काय म्हणाले होते संजय राऊत?

न्यायालय हल्ली कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरचं न्यायालय जामीन देते. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतात. देशाच्या न्यायव्यवस्थेला आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!