मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई आणि दिल्ली यासह बहुतांश प्रमुख शहरात पेट्रोलने सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे. इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, सलग दोन दिवस इंधन दरवाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज कोणताही बदल केला नाही. आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.
आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८६ रुपये आहे. एक लीटर डिझेल ८३.३० रुपयांना मिळत आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे.
करोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढीमुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात बुधवारी किरकोळ घसरण झाली होती. करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रमुख अर्थव्यवस्थांवर निर्बंध लागल्याने कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर परिणाम झाला. अमेरिकी डॉलर घसरल्यानंरतही कच्च्या तेलाची मागणी घटली. अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीमुळे तेलाच्या दरांवर आणखी दबाव आला.