ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामीण भागातील जनतेने टेस्टिंगसाठी पुढे यावे

 

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाला न घाबरता टेस्टिंग साठी पुढे यावे आणि तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी केले.

अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे
कोव्हिडं जनजागृती व १५ व्या वित्त आयोग कामकाजा बाबत पंचायत समिती गण स्तर बैठक पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अहिवळे,
बी.सी.पाटील, विस्तार अधिकारी तुळजापूरे,सलगरे आदीनी उपस्थित राहून सलगर गणातील सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना कोवीड-१९ प्रतिबंधक उपाय योजनाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.यावेळी गटविकास अधिकारी कोळी यांनी प्रत्येक गावात अँटीजन रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन केले.त्याचप्रमाणे ग्रा.पं.ला प्राप्त होणाऱ्या १५ व्या वित्त आयोग निधी संदर्भात माहिती अहिवळे व तुळजापूरे यांनी दिली.सदरचा कार्यक्रम कोवीड -१९ मुळे सोशल डिस्टसिंग पाळून पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा गुंडरगी या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्रदिप तोरसकर यांनी केले.तर आभार सातलिंग गुंडरगी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!