ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चौथ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे.

तिसऱ्या सामन्यात पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना पुकोव्हस्की जमिनीवर पडला. त्याच्या शरीराचा भार त्याच्या हातावर आला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच दिवशी त्याला पुढील वैद्यकीय चाचणीसाठी व स्कॅनसाठी नेण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली. पुकोव्हस्की सामन्यातून बाहेर गेला असून त्याच्या जागी मार्कस हॅरीसला संघात स्थान देण्यात आले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस ही जोडी चौथ्या कसोटीत सलामीला येण्याची शक्यता आहे.

मोठ्या काळानंतर संधी

मार्कस हॅरिसला वर्षभराच्या अतंराने संघात संधी देण्यात आली आहे. हॅरिस 2019 पासून कसोटी खेळला नाही. मार्कस हॅरिसला एशेस मालिके कॅमरुन बॅनक्राफ्टच्या जागी संधी देण्यात आली होती. यामध्ये त्याने 6 डावांमध्ये 58 धावा केल्या होत्या. मार्कसची भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र पुकोव्हसकी आणि वॉर्नरच्या दुखापतीनंतर अॅडिलेड आणि मेलबर्न कसोटीसाठी मार्कसला संघात समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच जो बर्न्सला दुखापत झाली. यामुळे मार्कसला संपूर्ण मालिकेत संधी मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!