कोल्हापूर,दि.६ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर
तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली आहे. शिक्षण क्षेत्रात डॉ. शेळके यांचे नाव मोठे आहे. त्यांच्या नियुक्तीचा फायदा कोल्हापूरकरांना आता होणार आहे.