ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” ; हर्षवर्धन जाधवांचं दानवेंना आव्हान

पुणे । भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. “रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” असे आव्हान हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना दिलं आहे.

रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने आपल्यावर गुन्हे दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. “पुढच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना घरी नाही बसवलं, तर की माझ्या बापाची अवलाद नाही. रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं,” असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

नुकतेच एका प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना जमीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या जामिनात राजकीय दबावाने गुन्हे दाखल झाल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे “राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं,” अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!