पंढरपूर | ऋतुमानानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना वेगवेगळे पोशाख परिधान करण्याची परंपरा आहे. आता थंडीची चाहूल लागल्याने दोन्ही मूर्तींना उबदार पोशाख परिधान केला जात आहे.
सावळ्या विठ्ठलाला पहाटे करवतकाठी उपरण्याची कानपट्टी बांधून शाल आणि रात्री शेजारतीनंतर रजई पांघरली जाते. रुक्मिणी मातेलाही शाल पांघरण्यात येत आहे. हा पोशाख थंडी संपेपर्यंत राहील, अशी माहिती श्री विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांनी दिली.