ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधनी (गुरुशांत माशाळ) : सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशातील विविध शेतकरी सांगटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद पुकारले आहे. या देशव्यापी भारत बंदला दुधनी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दुधनी शहर बंदचे आवाहन केले होते त्याला शहरवासीयांनी अतीशय भरभरुन प्रतीसाद दिला आहे.

सकाळी दहा वाजता काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आडत व भुसार व्यापार्यांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. त्या नंतर अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या नेतृत्वात दुधनीत रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदर रॅलीला दुधनी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून सुरुवात करण्यात आले. सदर रॅली गांधी चौक, सिद्धेश्वर मंदिर मार्गे दर्गा चौक, नागोबा नगर, भाजीपाला मार्केट मार्गे मैंदर्गी नाका, सिन्नूर नाका या मार्गावर काढण्यात आली. ‘रॅली दरम्यान देशविरोधी कायदे हटावो किसान को बचावो’, ‘शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अन्यथा खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. कांही दोन- तीन किराणा दुकान सोडले तर शहरातील बाजारपेठ पुर्णपणे बंद आहे.

यांची होती उपस्थिती

या वेळी आडत भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, भरतेश दोषी, शिवानंद माड्याळ, सिद्धाराम येगदी, गुरुशांत परमशेट्टी, गिरमल्लप्पा सावळगी, जगदीश माशाळ, सुभाष पादी, शिवानंद हौदे, बसण्णा धल्लु, रामचंद्र गद्दी, चांदसाब नाकेदार, गुरुशांत हबशी, शरणप्पा मगी, सातण्णा तुप्पद, सिद्दण्णा गुळगोंडा, चंद्रकांत बबलाद, संजय नूला, चंद्रकांत धल्लू, सुरेश जिवाजी, सैदप्पा परमशेट्टी, मलकण्णा गद्दी, विश्वनाथ म्हेत्रे, सुरेश परमशेट्टी, संतोष खराडे, किराणा व कापड व्यापारी असोसिएशनचे अनेक पदाधिकारी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!