ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत बंजारा समाजाकडून डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली

 

दुधनी,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाेहरादेवी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने बंजारा व इतर समाज पाेरका झालेला आहे. आज त्यांच्या अंतिम संस्काराकरिता संपुर्ण भारतातील विविध राज्यातुन बंजारा समाज व इतर समाज बांधव लाखाेच्या संख्येने दाखल झाले हाेते.संत रामराव महाराज जाण्याचे दु:ख संपुर्ण बंजारा समाज व इतर समाज बांधवांना झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी दुधनी येथील शिवाजी नगर तांडा येथे श्री रामराव महाराज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी गोविंद राठोड, विश्वनाथ राठोड, पोमू राठोड सर, भानूदास राठोड, भिल्लू चव्हाण, सुभाष चव्हाण, गुरुनाथ राठोड आकाश राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.दुधनीतील गांधी नगर तांडा, म्हेत्रे तांडा १ व २ येथेही श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!