दुधनी दि.२२ : तालुक्यातील दुधनी येथील शांभवी फौंडेशनच्यावतीने श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठात मकर संक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू व कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुर ग्रामीणचे महिला शाखा प्रमुख पोलीस उपनिरिक्षक सोनाली गोडबोले पाटील, शांभवी शंकराव म्हेत्रे, कोमल उदयकुमार म्हेत्रे, नगरसेविका सुनंदा चिंचोळी, नगरसेविका सुवर्णा पाटील, नगरसेविका शबाना मोमीन, नगरसेविका ललिता गद्दी, जगदेवी गद्दी उपस्थितीत होते.
शांभवी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई शंकरराव म्हेत्रे यांनी हळंदी कुंकु कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना सांगितले की, माहीलांना एकसंघ करण्याचं या मागचा उद्देश आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे एकमेकांमधील विचारांची देवाण- घेवाण होतो. त्या बरोबर हिंदु धर्मातील संस्कृतीची जतन आपण केले पाहिजे व पुढच्या पिढीला त्याचे महत्व समजले पाहिजे हेच या कार्यक्रमा मागचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले. महिलांसाठी गृह उद्योग सुरू करण्याचा उद्देशाने शांभवी फौंडेशनची स्थापना करण्यात आले आहे असे वैशालीताई म्हेत्रे यांनी सांगितले.
यावेळी सुनंदा मल्लिनाथ म्हेत्रे, राधिका संगमनाथ म्हेत्रे, अंजली राजू म्हेत्रे, नगरसेविका संगीता पाटील, नगरसेविका सुषमा धल्लू, सुमित्रा हबशी, ज्योती गद्दी, अंजनांदेवी पाटील, दीपिका बंदराड, सुनीता म्हेत्रे, संगीता अमाणे, सुहासिनी गद्दी, आयेशा बडेखा, बसम्मा सोरेगाव, सविता कुंभार, सुनंदा हावशेट्टी यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी येरटे यांनी केले तर लक्ष्मी उमेश म्हेत्रे यांनी आभार मानले.
जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शानाखाली निर्भया पथकाची स्थापना केली आहे. या पथकामध्ये महिलांवर छेडछड करणार्यावर कठोर कारवाई करण्यात येते. शाळा-कॉलेजमध्ये तक्रार पेटी लावली आहे. मुस्कान पथकाची स्थापना केली आहे. मुस्कान पथकामार्फत स्पेशल ऑपरेशन राबवुन १ महिन्याच्या आत हरवलेल्या लहान-मुलींना त्यांच्या आई-वडिलांना सुपुर्द करण्यात येते. २०२० मध्ये ७२ मुलामुलींना शोधुन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. महिलांनी आपल्या तक्रारीसाठी १०० नंबर किंवा १०९१ या क्रमांकावर फोन करुन तक्रार नोंदवावी –
सोनाली गोडबोले पाटील पोलीस उपनिरिक्षक, महिला शाखा प्रमुख,सोलापुर ग्रामीण.
यांचा करण्यात आला सत्कार :
नागुबाई काळे, लक्ष्मी गयक्वाड, बायाना बुरकुले, मंगल सावंत, रजनी बिराजदार, यल्लुबाई धरणे, गुरुबाई तळवार, ज्योती नंदुरे, महानंदा कलाल, उमादेवी शेरीकर, सवित्री पुजारी मंगला मगी या कोरोना योद्धांच्या शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.