नवी दिल्ली,दि.२८ : देशातील भ्रष्टाचार संपवणे ही एका कुठल्या संस्थेची जबाबदारी नसून ती आपणा सर्वांची आहे आणि सगळ्यांनी मिळून हि कीड नष्ट करायला हवी,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे आयोजित नवी दिल्ली येथील ‘भ्रष्टाचार प्रतिबंध आणि दक्षता’ या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे
ते बोलत होते.भ्रष्टाचारामुळे विकासकामाला अडथळा निर्माण होतो म्हणून विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने एक आराखडा बनवायला हवा, असेही ते म्हणाले.देशातील काळा पैसा होण्यासाठी आम्ही समिती स्थापन करून भ्रष्टाचार विरोधातील लढाई आणखी कठोर केली आहे. भारतासारख्या गरीब देशात भ्रष्टाचाराला स्थान असता कामा नये,असे देखील मोदी यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.