---Advertisement---

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट

Follow Us:
---Advertisement---

 

दुधनी,दि.२८ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मुंबईत जाऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली.

भेटी दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील मौजे रुद्देवाडी येथे १३२ के. व्ही चे सब स्टेशन मंजूर करण्यात यावे,अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे यासंदर्भात सिद्धाराम म्हेत्रे यांनी मंत्री राऊत यांना निवेदन सादर केले आहे.

आपण या संदर्भात मागील सरकारच्या काळात सुद्दा मागणी केली होती आणि पाठपुरावा केला होता मात्र मागील सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही.

रुद्देवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी कमी दाबाचा व सुरळीत वीजपुरवठा होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी वारंवार १३२ के.व्ही सबस्टेशनची मागणी करत आहे. याकरिता जमीन देखील उपलब्ध करून देण्यास तयार आहोत, असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!