दिल्ली,दि.२५ : देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण 81 पूर्णांक 74 टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात 81 हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 47 लाखांवर पोहोचली आहे. देशात शुक्रवारी 86 हजार रुग्ण आढळले आहेत.एकूण देशात आकडा जर पाहिला तर तो 58 लाख 18 हजार पोचलाय तर मरण पावलेल्या रूग्णांची संख्या 92 हजार 290 असल्याचं या वृत्तात म्हटले आहे. आतापर्यंत ६ कोटी 89 लाख 28 हजारपेक्षा जास्त चाचण्या कोरोनाच्या करण्यात आल्या आहेत.