दिल्ली,दि.१० : देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.त्या पार्श्वभूमीवर चाचण्या देखील वाढले असून आतापर्यंत देशात ७ कोटी ७० लाख रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत.
कोव्हिडं – १९ च्या दररोजच्या चाचणी करण्यामध्ये जगात आता भारत अग्रेसर ठरला आहे. सध्या एक दशलक्ष लोकसंख्येमागे ५० हजार चाचण्या होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.गेल्या दोन महिन्यात चाचण्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली असून गेल्या काही आठवड्यांपासून दररोज १२ लाख चाचण्या होत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून चाचण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे.