---Advertisement---

स्वच्छ भारत संकल्पनेतून देशातील ९७ टक्के शहरे हागणदारीमुक्त,केंद्र सरकारने दिली माहिती

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.१० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत स्वस्थतम भारत निर्माण करण्याच्या योजनेला देशात चांगला प्रतिसाद मिळाला असून देशातील ९७ टक्के शहरेही हागणदारी मुक्त झाले आहेत,अशी माहिती
केंद्र सरकारने दिली आहे.

याबाबतची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल दिली. स्वच्छ भारत योजना सुरू होऊन सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित स्वच्छताके छह साल, बेमिसाल या विषयावरील वेबिनार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये १२ कोटी पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला असून ९७ टक्के पेक्षा जास्त शहरे आता हागणदारी मुक्त झाले आहे,असे देखील यावेळी सांगण्यात आले तर देशात सध्या ६७ टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.देशात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत
आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!