---Advertisement---

‘नोकरी घालवू’ धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायाने घेतला टोकाचा निर्णय; प्रेयसीच्या पालकांवर गुन्हा !

By team
On: March 18, 2026 10:17 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई पोलिस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण पोलिस शिपायाने मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२, मूळ रा. जि. नांदेड) असे मृत पोलिस शिपायाचे नाव असून, त्यांनी कलिना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भैयासाब व्हावळे यांची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलिस दलात चालक पदावर निवड झाली होती. नव्या नोकरीनंतर ते कलिना येथील प्रशिक्षण केंद्रात प्राथमिक प्रशिक्षण घेत होते. मात्र, १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली असून, त्यामध्ये त्यांनी प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. भैयासाब यांचे नांदेडमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता.

सुसाईड नोटमधील मजकुरानुसार, प्रेयसीच्या वडिलांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, तर तिच्या आईकडून सातत्याने मानसिक दबाव टाकला जात होता. “आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू,” अशा प्रकारच्या धमक्यांमुळे ते प्रचंड तणावाखाली होते. नुकतीच मिळालेली नोकरी गमावण्याच्या भीतीने आणि सततच्या त्रासामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!