दिल्ली,दि.२९ : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाकरता किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच ठेवली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.राज्याकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारे 14 लाख टनापेक्षा जास्त डाळी आणि तेलबिया खरेदी करण्यासाठी काही राज्यांना मंजुरी दिली असल्याचे याबाबतच्या बातमीत म्हटले आहे.यात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगना आणि हरियाणा या राज्यात ही परवानगी असेल.