---Advertisement---

राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांसाठी राज्यपालांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

On: September 29, 2020 10:11 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२९ : राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरे बांधण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या नव्या बदलानुसार आता त्यांच्या लगतच्या परिसरामध्ये त्यांना जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने पावले उचलत वन अधिकार अधिनियम 2006 च्या नियमात बदल केला आहे. या बदलामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे,असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतची अधिसूचना ही काल जारी करण्यात आली आहे.राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी नंदुरबार, गडचिरोली, पालघर या जिल्ह्यांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली होती.
या भेटीदरम्यान स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. या
आधीसूचनेची प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!