ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देश पुन्हा होणार लॉकडाऊन?

नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसंच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील.

पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील.

दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी राहत असताना काही राज्यांमध्ये करोना संकट नव्याने उभं राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!