---Advertisement---

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

On: November 23, 2020 11:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी वधारले. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२३ रुपये आणि डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५३ रुपये असून डिझेल ७१.२५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.५३ रुपये असून डिझेल ७६.७२ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.१० रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.४८२रुपये प्रती लीटर झाले आहे.

युरोपात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात टाकले आहे. अनेक देशांनी लॉकडाउनचे संकेत दिल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची भिती ओपेक देशांनी वर्तवली आहे. त्यामुळे उत्पादन कपात करण्यात येत आहे. पुरवठा मर्यादित राहिल्याने मागील आठवडाभर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनीवरील दबाव वाढला आहे.

दरम्यान करोना लस लवकरात लवकर बाजारात आल्यास इंधन मागणी सुधारेल, असा आशावाद तेल उत्पादकानी व्यक्त केला आहे. आज सोमवारी सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव १७ सेंट्सने वाढून प्रती बॅरल ४५.१३ डॉलर झाला. त्याचबरोबर यूएस वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव ४ सेंटसने वधारून ४२.४६ डॉलर इतका झाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!