मुंबई : सोन्याच्या चांदीच्या भावात आज भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे. बाजारात सध्या सोने ४९ हजारांच्या खाली घसरले आहे. तर चांदीचा भाव एक किलोला ६० हजारांखाली आला आहे. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याबरोबरच चांदीचे दरही आज कमी झाले आहेत. एमसीएक्सवर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.9 टक्क्यानी कमी होऊन 49,051 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 550 रुपये अर्थात 0.09 टक्क्यांनी कमी होऊन 59,980 रुपये प्रति किलो झाले आहेत.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८९३४ रुपये आहे. त्यात ५४६ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव एक किलोला ५९९७८ रुपये आहे. त्यात सध्या ५४७ रुपयांची घसरण झाली आहे. मागील दोन दिवसांत सोने तब्बल १२०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ४९००० खाली घसरला आहे. तर चांदीमध्ये १६२८ रुपयांची घसरण झाली आहे. नफावसुलीने गेल्या आठवड्यात सोने ८३९ रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदीमध्ये २०७४ रुपयांची घसरण झाली होती. दिवाळीनंतर सोन्याची मागणी कमी झाली आणि भाव कोसळले असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
असा आहे आजचा भाव?
goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईतील सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९८०० रुपये झाला आहे. २४ कॅरेटचा भाव ५०८०० रुपये आहे. सोमवारच्या तुलनेत त्यात १५० रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८२५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३६३० रुपये आहे. त्यात ९८० रुपयांची घसरण झाली आहे.
आज कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ५००७० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५२४७० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६४४० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०६६० रुपये आहे.