ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे.  या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. दरम्यान, या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

महाविकास आघाडी सरकारल एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज भाजपकडून पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे. यावेळी  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या सरकारवर फडणवीसांनी सडकून टीका केली. ‘सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत गरीब, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील असं वाटत होतं. पण, मुख्यमंत्र्यांनी टीका केली. पुढची दिशा काय, काहीच सांगता आले नाही. मी यापूर्वी धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले. ते पुढे म्हणाले ,  मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही. ‘आधी टीका फडणवीस यांनी केली आहे.

 

“पाच वर्ष सरकार चालवणार असे हे म्हणतात. तुम्ही चालवा पण १ वर्षात काय दिसलं? हे सरकार जनतेचा विश्वासघात करुन आलेलं आहे. माझ्याकडे 2 पानांची यादी आहे, या सरकारने केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, कोरोनाकाळात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं,” असेही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!