ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नवीन संसद भवन हे नव्या आणि जुन्याच्या मिलाफाचे उदाहरण ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित आहेत. भूमीपूजन कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितीतांना संबोधित केलं.

 

देशाच्या प्रवासाचं हेदेखील एक प्रतिक राहिलंय. हे सर्व आपला वारसा आहे, परंतु संसदेच्या सामर्थ्यवान इतिहासाबरोबरच वास्तवही स्वीकारलं जाणं आवश्यक आहे. हे संसद भवन आता विश्राम मागतंय. नव्या निर्माणाच्या माध्यामातून संसद भवन अपग्रेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवी ध्वनी, आयटी सुरक्षा व्यवस्था वापरण्यात येणार आहे’ असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. नवीन संसद भवन हे नव्या आणि जुन्याच्या मिलाफाचे उदाहरण आहे. वेळ आणि गरजांच्या अनुषंगाने स्वतःमध्ये बदल करण्याचा हा एक प्रयत्न आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार असेल. जुन्या इमारतीमुळे देशातील आवश्यकता पूर्ण झाल्या परंतु नवीन संसद भवन २१ व्या शतकाच्या आकांक्षा पूर्ण करेल. आम्ही भारतीय लोक एकत्रितपणे आपल्या संसदेची ही नवीन इमारत बनवू… जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी साजरी केरल तेव्हा संसदेची नवीन इमारत होईल त्या महोत्सवाची प्रेरणा ठरेल, याहून पवित्र काय असू शकेल, असे उद्गारही यावेळी पंतप्रधानांनी काढले.

 

दरम्यान, जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याने नवी इमारत उभारण्यात येत आहे. नवी संसद इमारत त्रिकोणी रचनेत असेल. सध्याच्या राष्ट्रपती भवनापासून थेट इंडिया गेटपर्यंत 3 किलोमीटर परिसरात राजपथाच्या दोन्ही बाजूला इमारती उभारल्या जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!