बीड: कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पंकजा यांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत आहे असंही म्हटलं होतं. त्यानंतर आज पंकजा यांनी स्वत: माहिती दिली.
माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन. त्यानंतरच मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावेन अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या मतदानापासून पंकजा मुंडे लांब राहिल्या. त्यावेळी अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट करुन आपण आयसोलेट असल्याची माहिती दिली होती.