पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. आज मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही ठिकाणी मोदी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेतील.
पुणे दौऱ्यातील वेळत बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातही काहीसा बदल झाला आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते. मात्र, आता मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
या ठिकानी देणार भेट
ऍस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीचे उत्पादन घेणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.