---Advertisement---

व्यंगचित्रातून संजय राऊतांनी साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

On: November 28, 2020 11:59 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयामध्ये ईडीने छापे मारल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपवर टीकास्त्र सोडत आहे.  राज्यात भाजपा सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.


संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दोन कुत्रे दिसत आहे. यातील एका कुत्र्यावर सीबीआय, तर दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है… असे लिहिले आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात महाराष्ट्र असे लिहिले आहे. संजय राऊतांनी तासाभरापूर्वी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!