ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पत्रकारांनी निर्भिड व निपक्षपातीपणे समाजामधील होत असलेला अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे

अक्कलकोट (प्रतिनिधी):- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येते. वृत्तपत्र हा समाजाचा आरसा आहे. पत्रकारांनी निर्भिड व निपक्षपातीपणे समाजामधील होत असलेला अन्याय,अत्याचारा विरुद्ध लढा दिला पाहिजे. त्याकरिता पत्रकारांना सर्वोतपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी  केले.

दर्पण दिनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहर व तालुका कॉंग्रेस(आय) कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे नुतन अध्यक्षपदी पत्रकार रविकांत धनशेट्टी यांचा दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल व नगरसेवक सद्दाम शेरीकर यांची न.पा.चे बांधकाम सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्या दोघांचे विशेष सत्कार करण्यात आला.

तर पत्रकार दिनानिमित्त विश्व न्यूजचे संपादक मारुती बावडे,सोमशेखर जमशेट्टी,योगेश कबाडे, विरूपाक्ष कुंभार, अल्ताफ पटेल, सैदप्पा इंगळे, दयानंद दणुरे, स्वामीराव गायकवाड, महेश गायकवाड, अमोल फुलारी, राजेश जगताप, रियाज सय्यद, महेश गायकवाड यांच्या सह आदी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अक्कलकोट शहर काँग्रेस कमिटीचे महिला अध्यक्षा सुनिता हडलगी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, युवक शहराध्यक्ष मुबारक कोरबू, बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर, शहर उपाध्यक्ष बसवराज अल्लोळी, काशिनाथ कुंभार, अहमद शिलेदार, सतीश चिंचोळी, राहुल बकरे, सुनील इसापुरे, गुरू म्हेत्रे, विजयकुमार हडलगी, सिद्धू म्हेत्रे, रमेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी केले तर आभार युवक शहर अध्यक्ष मुबारक कोरबू यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!