ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसामुळे गळोरगी तलाव झाला ‘ओव्हर फ्लो’

 

अक्कलकोट,दि.२७: पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जलपुजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन,बसवंतराव कलशेट्टी,काशीनाथ प्रचंडे, सरपंच चंद्रशेखर आंदोडगी, वाहिदपाशा शेख, आजूरे, संतोष आळगी, धोंडप्पा बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार कल्याणशेट्टी व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गळोरगी तलाव मागे कमी पावसाने पूर्ण कोरडा पडला होता.त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या अभियान अंतर्गत अनुलोम संस्था व राज्य शासन यांच्यावतीने तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सूचनेनुसार व प्रयत्नातुन अनुलोम संस्थेकडून जेसीबी व पोकलेन देण्यात आले होते तर शासनाच्याकडून डिझेल देण्यात आले होते तर शेतकरी वर्गांकडून स्वतःच्या वाहनाने प्रचंड गाळ काढण्यात आला होता. सुमारे वीस किलोमीटर पर्यंत नागरिक गाळ नेऊन टाकले त्यामुळे तीन लाख घनमीटर गाळ काढण्यात आला होता.त्यामुळे सहा कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे.आता हा तलाव भरून वाहत आहे.त्यामुळे या तलावाच्या लाभक्षेत्रातील बासलेगावसह गळोरगी व त्याखालील अनेक गावातल्या शेतकरी वर्गास शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोय झाली आहे.यावेळी परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!