ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीची ‘आघाडी’,भाजप पिछाडीवर

 

पुणे,दि.३ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.रात्री साडे दहा पर्यंत अंतिम कल हाती येण्याची शक्यता आहे. पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे १० हजार मतांनी पुढे आहेत. शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार जयंत असगवकर हे सुमारे साडेचार हजार मातांनी पुढे आहेत.त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित मानला जात आहे.
शिक्षक मतदार संघात महाविकस आघाडीचे जयंत असगावकर आघाडीवर असून दुसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत. लोक भारती पक्षाचे गोरखनाथ थोरात तिसर्‍या स्थानावर असून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार चौथ्या स्थानावर आहेत. शिक्षक मतदारसंघात असगावकर यांना प्रथम पसंती मते 12 हजार 547 तर सावंत यांना 7 हजार 726 मते मिळाली आहेत.पदवीधर मतदार संघासाठी रात्री दहाच्या सुमारास निकाल निश्चित होऊ शकेल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!