ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसल्याने मोठी खळबळ

पुणे | पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. १३ दिवसांआधी ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडालेली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान देखील प्रशासनासमोर आहे.

बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आढळला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलिस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. रेस्क्यू करण्याचे काम चालू असून घटनास्थळी स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील हेदेखील बारकाईने लक्ष ठेवून उपस्थित आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे कृपया येथे कोणीही गर्दी करू नये असे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!