---Advertisement---

‘गाथा स्वामी समर्थांची’ मालिका लवकरच भाविकांच्या भेटीला

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२२ : आपल्या अक्कलकोट नगरीतून प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने अक्कलकोटच्या सुपुत्रांनी निर्माण केलेली व लिहिलेली स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेली” गाथा स्वामी समर्थांची” ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

या मालिकेच्या मुख्य भागांचे नामवंत कलाकारांच्या समवेत सध्या चित्रीकरण चालू आहे.श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, मालिकेचे लेखक व निवेदक तथा देवस्थानचे धर्मसंकीर्तनाचे संयोजक डॉ. हेरंबराज पाठक यांच्या लेखणीतून अवतीर्ण झालेली आहे.

निर्माता व संपादक सैदप्पा इंगळे यांच्या कल्पनेतून साकारलेली कॅमेरामन राजेश वडीशेरला यांच्या कॅमेर्‍यातून टिपलेली मालिका समर्थनगरी न्यूज चॅनलवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे.याचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!