ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ ; तपासा आजचे दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र आज गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे.आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ११ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. यात पेट्रोल २ रुपये ९४ पैशांनी महागले आहे. तर याच कालावधीत झालेल्या डिझेल दरवाढीने डिझेलमध्ये २.९६ रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या जवळपास सर्वच शहरांमध्ये पेट्रोलने उच्चांकी पातळीवर गेले आहे.या दरवाढीने आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.२० रुपयांवर गेला आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.६५ रुपये आहे. सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका उडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यावर तातडीने सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. कृषी अधिभाराचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.

मुंबईत आज गुरुवारी एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.२० रुपयांवर गेला आहे. एक लीटर डिझेल ८३.६७ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८६.६५ रुपये झाला असून डिझेलचा भाव ७६.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८९.१३ रुपये असून डिझेल ८२.०४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८८.०१ रुपये असून डिझेल ८०.४१ रुपये झाला आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.५४ रुपये असून डिझेलचा भाव ८१.४४ रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!