ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘बजेट’च्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला.

गेल्या आठवड्यात झालेल्या इंधन दरवाढीने मुंबई, दिल्ली आणि काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल विक्रमी पातळीवर गेले. गेल्या १० महिन्यात पेट्रोलमध्ये सरासरी १६ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलबरोबर डिझेलदेखील ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. जानेवारी १० वेळा डिझेलमध्ये दरवाढ झाली असून त्यात २.६१ रुपयांची वाढ झाली आहे. मागील १० महिन्यात डिझेल ४ रुपयांनी वाढले आहे.

आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८० रुपयांवर स्थिर आहे. एक लीटर डिझेल ८३.३० रुपयांना मिळत आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे. राज्यात अहमदनगरमध्ये पेट्रोल ९३.१८ रुपये आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक ९४.८४ रुपये इतका पेट्रोलचा भाव आहे. पुण्यात ९२.८३ रुपये दर आहे. तर ठाण्यात ९२.४४ रुपये इतका दर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!