ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बिबट्याला पकडण्याच्या शोध मोहिमेत रोहित पवारांचा पुढाकार ; स्वत: हातात घेतली काठी !

करमाळा | करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील हातात काठी घेऊन सहभागी झाले. रोहित पवार यांनी वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत भाग घेतला. रात्रीही बिबट्या हाती लागला नसला तरी पवारांनी संवाद साधत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण, वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

 

आमदार रोहित पवार कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा शेजारच्या तालुक्यातील हल्ल्याची एक घटना ताजी असल्याने पवार यांनी तेथे धाव घेतली. कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांसोबतच करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांशीही संवाद साधत त्यांना धीर दिला. रात्रीच्या गस्तीवरील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधून मोहिमेची माहिती घेतली.

या कामात त्यांना प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून आमदार पवार यांनी स्वत: हातात काठी घेतली आणि वन विभागाच्या पथकात काही काळ गस्तीत सहभाग नोंदविला. करमाळा तालुक्यातील वांगी, सांगवी येथे जाऊन त्यांनी ग्रामस्थांशीही संवाद साधला. काहीही करून बिबट्याला तातडीने पकडावे किंवा मारावे व आमची या संकटात सुटका करावी, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!