ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बीएमआयटी सोलापूर आणि युनिटी ग्रुप पुणे यांच्यात सामंजस्य करार

सोलापूर  : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या मंगळवेढा रोडवरील  ब्रम्हदेवदादा माने इन्सिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अर्थात बीएमआयटी व  इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल   क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी युनिटी ग्रुप  यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला .

याप्रसंगी   कंपनीचे अधिकारी प्रताप कुंभार, रोहित गोरे , संस्थेचे  उपाध्यक्ष पृथ्वीराज माने, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राहुल माने आणि  प्रभारी प्राचार्य प्रा. एस.जि. कुलकर्णी उपस्थित होते.

या सामंजस्य करार अन्वये  अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असलेल्या कंपनीतून विद्यार्थ्यांना डिझाइन , रेडिओ कमिशनिंग , मार्केटिंग मॅनेजमेंट  इत्यादी विषयांवर   प्रशिक्षण दिले जाणार आहे . यामुळे बीएमआयटीच्या विद्यार्थ्यांना  इलेक्ट्रिकल,  इलेक्ट्रॉनिक्स व मॅनेजमेंट   क्षेत्रातील  रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

संस्थेचे ट्रेनिंग आणि  प्लेसमेंट फीसर प्रा. आर पी नगरकर  व त्यांचे सहकारी  प्रा. डी ए कुंभार   यांनी हा सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी विशेष  परिश्रम घेतले .

हा कार्यक्रम  यशस्वी होण्यासाठी  संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने, संस्थेच्या सचिवा जयश्री माने, उपाध्यक्ष पृथ्वीराज माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!